पावसाच्या काळजीचे कारण नाही : केंद्र

0
141

जुलै मध्ये मोसमी पावसाने जोर पकडला असून पावसाची संभावित तूट ३१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असून विनाकारण पावसाची काळजी करण्याची गरज नाही असे मत केंद्राने व्यक्त केले आहे.
वेधशाळेचे महासंचालक लक्ष्मण सिंग राठोड यांनी सांगितले की, मान्सूनची तूट १२ टक्क्यांनी कमी झाली असून एकूण तूट आता ३१ टक्के इतकी उरली आहे.
दरम्यान, भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांच्या सरकारी वक्तव्यात म्हटले आहे की, १३ जुलैपासून देशात मान्सूनने जोर पकडला आहे. काल मंत्र्यांनी वेधशाळेच्या आकडेवारीची माहिती करून घेतली. जून महिना व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ४३ टक्के पावसाची तूट होती. ती आता ३२ टक्के झाली आहे. येत्या दोन आठवड्यात चांगला पाऊस पडण्याचा अनुमान असल्याचेही ते म्हणाले. १ ऑगस्टपासून पाऊस अधिक कार्यरत होणार असल्याचे वेधशाळेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले. १७ जुलै रोजी संपूर्ण देशात सरासरी २४१ मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वसामान्य परिस्थितीत ३४७.७ मी.मी. पावसाची नोंद होत असते.