पाळीतील ४० ग्रामस्थ अस्वास्थामुळे इस्पितळात

0
208

डिचोली (न. प्र.)
पाळी -कोठंबी पंचायत विभागातील देऊळवाडा, पारोडा, अंतरशे या गावातील ३५ ते ४० लोकांचे आरोग्य अचानक बिघडल्याने व सर्वांत एकाच प्रकारची लक्षणे दिसून आल्याने विविध इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले. सदर प्रकार हा दूषित पाण्यामुळे की अन्य काही कारणामुळे घडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांना शौच, उलटी, पोटात मळमळणे आदी लक्षणे दिसून आल्याने व अनेकांची तब्येत बिघडल्याने त्यांना गोमेकॉ, फोंडा, साखळी व इतर खाजगी इस्पितळात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रात्री या भागातील सर्वांची भेट सगळ्यांची विचारपूस केली.