सर्वोच्च न्यायालय राज्यातील पाच नगरपालिकांतील निवडणूक आरक्षणप्रश्नी उद्या शुक्रवार दि. १२ मार्च रोजी निवाडा देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या पाच नगरपालिका क्षेत्रातील निवडणूक आरक्षण प्रक्रिया नव्याने करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर मंगळवार ९ मार्चला सुनावणी घेण्यात आली असून निवाडा राखून ठेवला आहे.