नगरपालिका निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी काल व्यक्त केली. यासंबंधी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यातील १२ नगरपालिकांसाठी निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या पुढील आठवड्यात घेण्यासाठीची सगळी तयारी आयोगाने केली आहे. मात्र, निवडणुकांसाठीची तारीख सरकारला ठरवावी लागेल. आम्ही निवडणुकांसाठी सज्ज झालेलो असून सरकार निवडणुकांसाठीची तारीख कधी जाहीर करते याची आम्ही वाट पाहत आहोत. राज्य निवडणूक आयोगाला नगरपालिकांच्या प्रभागांच्या फेररचनेसंबंधीच्या अहवालाचीही प्रतीक्षा असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.