पालिका निवडणुका तीन महिने लांबणीवर

0
200

राज्यातील ११ नगरपालिका, तसेच पणजी महानगरपालिका मंडळाची निवडणूक येत्या एप्रिल २०२१ पर्यत किंवा निवडणूक आयोगातर्फे तारीख निश्‍चित करीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अकरा नगरपालिका मंडळाची निवडणूक आणखी तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. या नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पणजी महानगरपालिका मंडळाची मुदत मार्च २०२१ मध्ये समाप्त होत आहे. ही निवडणूक एप्रिल २०२१ पर्यत पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यातील विविध ग्रामपंचायतींमधील प्रभागाच्या पोटनिवडणुका, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील निवडणूक तीन महिन्यासाठी किंवा आयोगातर्फे तारीख निश्‍चित करेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.