>> दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघेजण जखमी
पालयेतील भोम पठारावर काल (दि. 20) मध्यरात्री 2 वाजता दोन दुचाकी वाहनांमध्ये अपघात होऊन निखिल सागर (30, रा. दिल्ली) ह्या पर्यटकाचा मृत्यू झाला. या घटनेत स्थानिक साईश संतोष परब हाही गंभीर जखमी झाला. तसेच एक रशियन महिला देखील जखमी झाली.
सविस्तर माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास साईश संतोष परब हा बुलेट दुचाकीवरून (क्र. जीए-11-एफ-0011) हरमलहून केरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोर येणाऱ्या ॲक्टिवा दुचाकीला (क्र. जीए-11-एफ-8642) जबरदस्त धडक बसली. त्यात ॲक्टिवाचालक निखिल सागर याचा मृत्यू झाला. तसेच जुलिया ही रशियन पर्यटकही जखमी झाली. तसेच तसेच साईश संतोष परबही जबर जखमी झाला. त्यांच्यावर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघाताची मांद्रे पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच जखमींना इस्पितळात दाखल केले.