पार उसगाव येथे दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

0
11

पार – उसगाव येथे काल सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात संजय बाबलो पेडणेकर (52, गावठण- खांडेपार) यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी रस्त्यावर पडली व त्यांचा मृत्यू झाला. संजय पेडणेकर हे एमआरएफ कंपनीचे कर्मचारी असून रात्रपाळी करून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला हा अपघात झाला.

रात्र पाळी करून सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास संजय पेडणेकर हे जीए 11 बी 6451 ही दुचाकी घेऊन घरी जात होते. पार – उसगाव येथील एकेरी मार्गावर अचानक गाय रस्त्यावर आल्याने तिला दुचाकीची धडक बसणार होती. ती चुकवण्याच्या नादात दुचाकी रस्त्यावर कोसळली. यात दुचाकीचालक पेडणेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपाचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.