गोवा राज्याचा २०१५-१६ वर्षासाठीचा अर्थसंकल्प दि. २५ रोजी मांडण्यात येणार असून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असेल. विधानसभेचे अधिवेशन दि. २३ पासून सुरू होईल. त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक काल झाली. या बैठकीत दि. २५ रोजी अर्थसंकल्प मांडण्याचे निश्चित करण्यात आले आहे.