पाय फॅ्रक्चर झाल्याने शरद पवार इस्पितळात

0
101

नवी दिल्ली येथील निवासस्थानी पडल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येऊन ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. खास विमानाने पवार यांना काल सकाळी ११.१५ वा. मुंबईत आणण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिका व कन्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यानंतर इस्पितळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळ त्यांना इस्पितळात भेटले.