पाणी पिण्यासाठी शाळेत आता खास ‘दो’ मिनट

0
193

राज्यातील शालेय मुलांना पाणी पिण्यासाठी खास दोन मिनिटांचा वेळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासंबंधीचे एक परिपत्रक शिक्षण खात्याने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी केले आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विशेष मुलांच्या विद्यालयांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळेत मुले योग्य प्रमाणात पाणी पीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक मुलांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने हे परिपत्रक जारी केले आहे.

विद्यालयीन वेळात मुलांना दुसर्‍या आणि सहाव्या तासानंतर खास पाणी पिण्यासाठी २ मिनिटांची सुट्टी द्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.