पाटणा दसरा उत्सवादरम्यान येथे झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेसंदर्भात निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन बिहार सरकारने काल एका जिल्हा दंडाधिकार्यासह चार वरिष्ठ अधिकार्यांची उचलबांगडी केली. या दुर्घटनेत ३३ जण मृत्यूमुखी पडले होते. या दुर्घटनेवेळी निष्काळजीपणा केल्याचे आणखीण कोणी आढळून आल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाटण्याचे विभागीय आयुक्त एन. विजयलक्ष्मी, जिल्हा दंडाधिकारी मनिषकुमार वर्मा, पोलीस उपहानिरीक्षक अभिजित वर्मा, वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.