पाटणात चेंगराचेंगरी;  ३२ मृत्युमुखी

0
83

येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी मैदानात काल दसर्‍यानिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम आटोपून लोक परतत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ जण मृत्युमुखी पडले तर ५० जखमी झाले. जखमींना पटना वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मृतांत २७ महिला व १० मुलांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रु. तर जखमींना ५० हजार रु. कार्यक्रम संपल्यानंतर काहीजण घाई घाई बाहेर जायला लागले त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली, असा प्राथमिक निष्कर्ष वर्तविण्यात आला. तर काहींच्या मते जीवंत वीज वाहिनी जमिनीवर पडल्याची अफवा पसल्यानंतर लोकांची धावाधाव सुरू झाली.