पाटकर, आलेमाव यांनी घेतली राहुल गांधींची भेट

0
11

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल भेट घेतली. केंद्रीय नेते राहुल गांधी यांच्यासमवेत कॉंग्रेस पक्ष बांधणीच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. गोवा प्रदेश कॉंग्रेस नवीन समिती पक्षनिष्ठ, प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्त्यांची असणार आहे, असे पाटकर यांनी या भेटीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.