पाच वर्षांत 61 मराठी सरकारी शाळा बंद

0
7

डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली विधानसभेत माहिती

गेल्या पाच वर्षांत राज्यात मराठी माध्यमातील 61 सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याची माहिती शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका अतारांकित प्रश्नाचे उत्तर देताना गोवा विधानसभेत दिली. त्यापैकी 2019-20 या साली 10 शाळा बंद पडल्या. तर 2020-21 या साली 11 शाळा बंद कराव्या लागल्या. 2021-22 साली 8, 2022-23 साली 11, 2023-24 साली 14 तर चालू 2024-25 या साली 7 शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या.
2019-20 या साली डिचोलीतील-4, केपे येथील-2, तिसवाडीतील-1, फोंड्यातील-1, पेडणे, मालपे येथील -1, कट्टेवाडा, मोरजी येथील-1 अशा 10 शाळा बंद पडल्या.

2020-21 या वर्षी डिचोली येथील-3, फोंडा येथील-2, सत्तरी येथील-2, सांगे येथील-2, पेडणे येथील-1 तर कांदोळी येथील-1 अशा 11 शाळा बंद पडल्या.
2021-22 साली बंद पडलेल्या शाळांची संख्या ही 8 एवढी असून त्यापैकी बार्देश येथील-1, वास्को-दगामा येथील-1, असोळणा, सासष्टी येथील-1, तिसवाडीतील-1, बेतुल-केपे येथील-1, निरंकाल-फोंडा येथील-1, अशा शाळांचा समावेश आहे.
2022-23 या वर्षामध्ये 11 शाळा बंद पडल्या. 2022-23 या साली काणकोण येथील-3 अंबाजी फातोर्डा येथील-1, बार्देशमधील-3, पेडण्यातील-1, डिचोलीतील-1, सांगे येथील-1, धारबांदोडा-1, काणकोण-1 अशा शाळा बंद पडल्या.
सन 2023-24 मध्ये बंद पडलेल्या शाळांची संख्या ही 14 एवढी आहे. त्यापैकी काणकोण येथील-5, डिचोलीतील-3, वास्को-1, सासष्टी-3, सांगे-1, फोंडा-1 या शाळांचा समावेश आहे.

तर 2024-25 या चालू वर्षी बंद पडलेल्या शाळांची संख्या ही 7 एवढी आहे. त्यापैकी डिचोलीतील-4, फोंडा-3 शाळा बंद पडलेल्या आहेत.
सर्वाधिक-14 डिचोलीत तर सर्वात कमी-1 शाळा धारबांदोडा तालुक्यात बंद पडली. वरील 5 वर्षांच्या काळात सरकारने 10 शाळांसाठी नव्या इमारती बांधल्या अशी माहिती यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी दिली.