‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोरजी पंचायत क्षेत्रातील ५ दिवसांच्या गणपतींचे मोरजी समुद्र किनार्यावर व शापोरा नदीत विसर्जन करण्यात आले. यावेळी दिंडीसहीत किनारी भागात लांब रांगा लागल्या होत्या. यात बालगोपाळांसहीत विविध थरातील लोक सहभागी झाले होते.
अधुनमधून पडत असलेल्या पावसाची पर्वा न करता गणेशभक्तांनी सुरक्षितपणे टेंपो, रिक्षा अशा वाहनांतून विसर्जनाच्या स्थळी नेण्यात आले. गणपती विसर्जन करतेवेळी किनारी भागात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बंधु-भगिनी सहभागी झाल्या होत्या. गावडेवाडा, विठ्ठलदास व तेंबवाडा या किनार्यावर व नारोजीवाडा शापोरा नदीत गणपती विसर्जनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. यावेळी ५०० पेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विविध ठिकाणचे गणपती एकत्रित झाल्यानंतर, सामूहिकपणे भजन, आरती व सामुदायिकपणे गार्हाणे घालण्यात आले.
पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
गोव्यात ठिकठिकाणी पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पडणार्या संततधार पावसाने उसंत घेतल्यामुळे भाविकांची बरीच सोय झाली.