ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार रा. रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. एमजीएम रुग्णालयात बोराडे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पाचोळा ही त्यांची सुमारे 55 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कादंबरी प्रचंड गाजली होती. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर 1940 रोजी झाला होता. लातूर जिल्ह्यातील ‘काटगाव’ सारख्या छोट्याश्या गावात त्यांचा एका शेतकरी कुटुंबात झाला होता.