> डॉ. मनमोहनांच्या माजी सल्लागाराची माहिती
गुजरात विधानसभा निवडणुकीत हस्तक्षेपासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आल्याचा आरोप डॉ. सिंग यांचे तत्कालीन सल्लागार प्रेमकुमार झा यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना फेटाळला. ही बैठक म्हणजे कोणताही गुप्त कार्यक्रम नव्हता असेही झा यांनी यावेळी स्पष्ट केले.
याविषयी माहिती देताना झा यांनी सांगितले की कॉंग्रेसचे नेते मणीशंकर अय्यद यांनी पाकिस्तानचे विदेश मंत्री खुर्शीद कसुरी यांनी मेजवानीचे आयोजन आपल्या निवासस्थानी केले होते. या कार्यक्रमाबाबत कोणतीही गुप्तता नव्हती. या कार्यक्रमाला अय्यर यांनी आपल्यासह सुमारे १५ जणांना निमंत्रित केले होते. त्यात माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व डॉ. मनमोहन सिंग हेही होते.
आपण काहीही बोलणार नाही या अटीवरच ते आले होते. आमचे व कसुरी यांचे म्हणणे केवळ ऐकून घेणार असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले होते. डॉ. सिंग व हमीद अन्सारी यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने उभयतांनी अशा कार्यक्रमाचा तपशीलही संबंधित यंत्रणेला दिलेला असतो. असे झा यांनी सांगितले.
तसेच सर्व निमंत्रण इमलेवरून देण्यात आली होती, व्हॉटस् ऍप किंवा अन्य माध्यमातून नव्हे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमास काही माजी राजनैतिक अधिकारीही उपस्थित होते असे ते म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांनीही सोमवारी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.