काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाक सैन्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. पुन्हा भारतीय चौक्या व नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचे धाडस पाक करणार नाही असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे केला. येथील विधानसभा निवडणूक प्रचारसभेत मोदी बोलत होते. ही वेळ या विषयावर भाषण बाजी करण्याची नाही असेही ते म्हणाले. भारतीय जवानांनी पाक हल्ल्यांना लगाम घातला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाक सैनिकांच्या हल्ल्यांचे बळी ठरलेल्यांना भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.