पाक टेररिस्तान

0
117

>> भारताचे सडेतोड उत्तर

संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी भारतावर केलेल्या आरोपांना भारताने चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तान टेररिस्तान असल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांचा गड असलेल्या पाकिस्तानकडून मानवाधिकाराचे ज्ञान नको असा हल्ला चढवत ओसामा बिन लादेन, मुल्ला उमर यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानचे दहशतवादाने पीडित असल्याचा दावा साफ खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे.