पाकिस्तान सीमेवर स्वदेशी तेजस या महिन्यात तैनात

0
10

पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमेवर पहिली स्क्वाड्रन बिकानेरच्या हवाई तळावर तैनात होणार आहे. या दलाचे पहिले विमान याच महिन्यात तैनात होणार आहे. वर्षाखेरीस या तळावरील सर्व 18 विमाने ताफ्यात येतील. त्यात दोन प्रशिक्षणाची विमाने आहेत. आगामी पाच वर्षांत पश्चिमेकडील आघाडीवर तेजसचे आणखी दोन स्क्वाड्रन तैनात होतील. निवृत्त होणाऱ्या मिग 21 व मिग 27 ची जागा तेजस घेईल. तेजसमुळे देशाची पश्चिमेकडील सीमेचे हवाई क्षेत्र सुरक्षेच्या दृष्टाने अधिक बळकट होईल. राजस्थानच्या नाल येथे तेजसची पहिली स्क्वाड्रन आल्यानंतर पश्चिम आघाडीवर तीन ते चार वर्षांनंतर आणखी हवाई दल तैनात केले जाणार आहेत. नालनंतर गुजरातच्या कच्छ भागात हवाई तळावर तेजसची दुसरे स्क्वाड्रन तैनातीची योजना आहे. हवाई दलास 83 विमानांच्या माध्यमातून चार स्क्वाड्रनएवढी विमाने मिळतील.