इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा डाव १७४ धावांत आटोपला आहे. इंग्लंडने दिवसअखेर २ बाद १०६ अशी भक्कम स्थिती गाठली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा संघ ७ बाद ७९ अशा संकटात सापडला होता. तळाला शादाब खान (५६), मोहम्मद आमिर (१३) व हसन अली (२४) यांच्यामुळे पाकला १७४ सन्मानजनक स्थिती गाठता आली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी तीन तर पदार्पणवीर सॅम करन याने एक गडी बाद केला.
इंग्लंडने दिवसअखेर किटन जेनिंग्स (२९) व ऍलिस्टर कूक (४८) यांना गमावले आहे. कर्णधार ज्यो रुट २९ धावांवर नाबाद आहे. नाईट वॉचमन डॉमनिक बेस याने अजून खाते उघडलेले नाही. आज सामन्याचा दुसरा दिवस असून मोठी आघाडी घेण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरणार आहे. लॉडर्स झालेला मालिकेतील पहिला सामना जिंकून पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.