अल्प काळाच्या खंडानंतर पाकिस्तानने काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीकच्या भारतीय चौक्यांना पाक सैनिकांनी लक्ष्य केले. भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यांचा त्यांना सामना करावा लागला.पूँछ जिल्ह्याच्या बानवत विभागातील भारतीय चौक्यांवर पाक सैनिकांनी गोळीबार केल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली. मात्र भारतीय बाजूने कोणतीही जीवितहानी नसल्याचे या अधिकार्याने सांगितले. गुरुवारी रात्रीनंतर पाककडून गोळीबार थांबला होता.