पाकिस्तानी पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदींना शुभेच्छा

0
107

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याआधी गुरुवारी मोदी यांनी पाकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाचा शुभेच्छा दिल्या होत्या. भारतीय नागरिकांच्या समृद्धीसाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे शरीफ यांनी भारतातील आपल्या दुतावासातून पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान भारताविरुद्ध छुपे युद्ध करीत असल्याची टिप्पणी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर उभय देशप्रमुखांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या आहेत.