पाकिस्तानच्या संसदेला आंदोलकांचा घेराव

0
95
पाकिस्तानच्या संसदेबाहेर ठाण मांडून बसलेले निदर्शक.

पंतप्रधान शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या हजारो आंदोलकांनी काल पाकिस्तानच्या संसदेला घेराव घातल्याने लोकप्रतिनिधींची कोंडी झाली.
कॅनडास्थित धर्मगुरू तहीरूल कादरी यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करताना संसदेचे दरवाजे अडवा व लोकप्रतिनिधींची नाकेबंदी करा असे आवाहन परवा केले होते. त्यानंतर लोकांनी काल मोर्चा काढला.
कादरी तसेच पाकिस्तानचे विरोधी नेते इम्रान खान यांनी गेले सात दिवस देशाच्या विविध भागांमध्ये शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. २०१३ची लोकसभा निवडणूक धोकेबाजीने सरकारपक्षाने जिंकल्याचा दोघांचा आरोप आहे. नव्या निवडणुकीची दोन्ही नेत्यांची मागणी आहे.
दरम्यान, सरकारविरोधी आंदोलनासाठी काल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान व कादरी या दोघांनाही समन्स बजावले असून आज गुरूवारी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे सरकारने दोन्ही नेत्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे. कादरी यांनी या चर्चेस सकारात्म प्रतिसाद दिला असला तरी इम्रान खान यांनी नवाज शरीफ पंतप्रधानपदाचा राजीनामा देईपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले.