पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

0
17

>> 10 रोजी देशभरातील रेल्वेगाड्या थांबवणार

पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये 201 खासदारांचा पाठिंबा मिळाला. पाकिस्तानी मीडिया ‘द डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, 92 खासदारांनी पीटीआय समर्थक उमेदवार उमर अयुब यांना मतदान केले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक यांनी निकाल जाहीर केला.

पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी नवाझ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी गाझामध्ये पॅलेस्टाईन आणि भारतात काश्मिरींवर अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय यावर मौन बाळगून आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन काश्मीर आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी संसदेत ठराव मांडला पाहिजे असे सांगितले. शाहबाज यांनी, माझा भाऊ तीनदा पंतप्रधान म्हणून निवडून आला, तेव्हा देशात जो विकास झाला, ते एक उदाहरण आहे. नवाझ शरीफ यांनीच पाकिस्तान निर्माण केला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दुसरीकडे झुल्फिकार अली भुत्तो यांचे बलिदान देश कधीच विसरू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशातील दहशतवाद आणि त्याची मुळे नष्ट करण्याची शपथ घेतली.