पाकिस्तानचा इराणवर प्रतिहल्ला

0
23

>> दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा

दोन दिवसांपूर्वीच इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत बलुचिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने आता इराणवर हवाई हल्लाकेल्याचा दावा काल केला. पाकिस्तानने बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनांच्या इराणमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या म्हटले आहे. या हल्ल्यात 9 जण ठार झाल्याचाही दावा केला जात आहे.
पाकिस्तान आणि इराणमध्ये अभूतपूर्व तणाव सुरू आहे. इराणच्या सिस्तान, बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानने समन्वय साधून अचूकतेने दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. अनेक दहशतवादी यामध्ये मारले गेले, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इराण आमचा बंधू देश आहे. पाकिस्तानी जनतेला इराणी नागरिकांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
पाकिस्तानकडून इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील एका गावावर क्षेपणास्त्र डागण्यात आली, असे इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला; मात्र त्यात एकही इराणी नागरिक नाही, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.