पाकच्या गोळीबारात दोन जवान शहीद

0
185

पाक सैनिकांनी काल दिवसभरात चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना दोन ठिकाणी शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केले. तसेच या हल्ल्यांत भारताचा एक जवान कुपवाडा भागात शहीद झाला. राजौरी व पूँछ या भागांमध्येही नियंत्रण रेषेजवळून पाक सैनिकांनी भारतीय हद्दीत हल्ले चढवले. भारतीय सैनिकांनीही त्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले. नौगामातही एक जवान हुतात्मा झाला.
पाक सैनिकांनी निवासी भागांमध्ये उखळी तोफांचा मारा केल्याने राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा भागातील १२ शाळकरी विद्यार्थी व एका हायस्कूलचे सुमारे ५० विद्यार्थी इमारतीत अडकले. नंतर त्यांना तेथून सुखरुप हलविण्यात आले. हायस्कूल इमारत उंच ठिकाणी असल्याने मदतकार्यात अडचण आली होती. कुपवाडा जिल्ह्यात पाकच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना बुलेटप्रुफ वाहनांमधून त्यांच्या घरी सोडण्यात आल्याची माहिती राजौरी जिल्ह्याचे उपायुक्त शाहीद इकबाल चौधरी यांनी सांगितले.