पहिल्या दिवशी ५००० मुले लसवंत

0
15

राज्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला कालपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सुमारे ५०९६ मुलांना लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली.

राज्यातील विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालयांतील सुमारे ७२ हजार मुलांना कोरोना लस दिली जाणार आहे. या लसीकरणाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५०९६ मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या लसीकरणासाठी पात्र मुलांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे.

१५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी संबंधित विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुलांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात जाण्याची गरज नाही. पहिला डोस दिलेल्या मुलांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे.