पंचायत निवडणूक
राज्यातील १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास कालपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक १० ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी आसगाव, सांताक्रुझ, वन-म्हावळींगे, नार्वे, लोटली, बाणावली, ङ्गातर्पा, किटला आणि श्रीस्थळ या पंचायत क्षेत्रात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात खास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिक निवडणुकीच्या संबंधित तक्रारीसाठी ०८३२-२२२५३८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे कळविण्यात आले आहे.