पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जण ठार तर सहा जखमी झाले आहेत. ‘कामतपूर लिबरेशन ऑर्गनायझेशन’च्या (केएलओ) दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे.
बाजरापाडा गावामध्ये सायंकाळी सातच्या सुमारास सायकवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा हा स्फोट झाला. स्फोट आयईडी वापरून करण्यात आले.