पश्चिम बंगालमध्ये 10 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

0
7

पश्चिम बंगाल पुन्हा एकदा हादरले आहे. बंगालच्या दक्षिणेकडील 24 परगणा जिल्ह्यातील जयनगर येथील एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने स्थानिक पोलीस चौकीलाच आग लावली आहे. तर, परिसरातील वाहनांची तोडफोड करुन पोलिसांवरही दगडफेक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तर, पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे. त्याची चौकशी केल्यानंतर समोर आले की, घटनेच्या दोन दिवसाआधीपासून तो पीडित मुलीला आइस्क्रीम खाऊ घालत होता. तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. शुक्रवारी मुलीला त्याच्या सायकलवर बसवून एका अज्ञात स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर गळा घोटून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला.