पश्चिम बंगालमधील बांकुरा परिसरात काल रविवारी पहाटे चारच्या दरम्यान दोन रेल्वे मालगाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरले. हा अपघात राज्यातील ओडा स्थानकाजवळ घडला. मागून येणाऱ्या मालगाडीने समोर चाललेल्या मालगाडीला मागून धडक दिली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ एका मालगाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त दोन्ही मालगाडीमध्ये कोणतेही सामान नव्हते. मात्र त्यांचा अपघात नेमका कसा झाला याच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 14 रेलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर तीन गाडयांचा मार्ग बदलण्यात आला आहे.