भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजीत राज्य युवा संसद उद्या शुक्रवार दि. 28 मार्च रोजी पर्वरी येथील विधान भवनात संपन्न होणार आहे. उत्तर गोवा व दक्षिण गोवा स्तरीय युवा संसद कार्यक्रमातून निवडलेले 20 युवा वक्ते सदर राज्य युवा संसदेत सहभाग घेणार आहेत. राज्य युवा संसदेतील 20 वक्त्यांपैकी उत्कृष्ट प्रथम तीन जणांची निवड करून त्याना दिल्ली येथे आयोजीत राष्ट्रीय युवा संसदेत सहभागी होण्यासाठी पाठवले जातील. दिल्ली येथील राष्ट्रीय युवा संसद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.