पर्वरी येथे टँकरखाली सापडून दुचाकीचालक ठार

0
6

येथील तीन बिल्डिंगजवळील मार्गावर टँकरखाली सापडून दुचाकीचालक ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी येथील तीन बिल्डिंग मार्गावर टँकरखाली (क्र. जीए-03-डब्ल्यू-2011) दुचाकीवरून जाणारा प्रदीप खोर्जुवेकर (रा. शापोरा) घसरून चाकाखाली सापडला गेला. चाकाखाली चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. टँकरचालक भीमराव वालीकर (रा. म्हापसा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.