येथील जुन्या बाजारात बुधवारी रात्री अकरा वाजता पर्यटन टॅक्सी आणि मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन एकनाथ तुळसकर (४०, पर्वरी) यांचे निधन झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पर्वरीतील जुना बाजार येथे बुधवारी रात्री अकरा वाजता एकनाथ तुळसकर हे आपल्या मोटारसायकलने (जीए ०३ बी ९६१८) घरी जात असताना पाठीमागून पर्यटन टॅक्सीने (जीए ०६ टी ३३२३) जोरदार ठोकर दिल्याने एकनाथ हे रस्त्यावर ङ्गेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. त्यांना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले असता तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. टॅक्सीचालक रॉक अंतोनी (वास्को) याला पोलिसांनी अटक केली असून उपनिरीक्षक सगुण सावंत यांनी पंचनामा केला.