पर्वरीत आदिवासी भवन उभारणार

0
48

>> मंत्री गोविंद गावडे यांची माहिती

पर्वरी येथे गोमंतक गौड समाजाच्या मालकीच्या जागेत गोव्यातील पहिले आदिवासी भवन उभारण्यात येणार आहे. या भवनामध्ये समाजातील ग्रामीण भागातील मुलांच्या निवासाची सोय केली जाणार आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

आदिवासी भवनाची गेल्या कित्येक वर्षापासून मागणी केली जात होती. त्यामुळे पर्वरी सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी भवन उभारले जाणार आहे. या भवनामध्ये व्यवसायासाठी थोडी जागा उपलब्ध केली जाणार आहे. या आदिवासी भवनाच्या तीन व चार मजल्यावर समाजातील विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली जाणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थी पणजी व इतर ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांना ये-जा करण्यासाठी भरपूर आर्थिक त्राण सहन करावा लागत आहे. या मुलांना आदिवासी भवनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.