पर्वरीतील अपघातात महिला ठार

0
5

पर्वरी महामार्गावरील तीन बिल्डिंगनजीक सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीत अपघात होऊन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी 9.10 वाजता पर्वरी महामार्गावरील तीन बिल्डिंग परिसरातील नवरत्न हॉटेलसमोर टिपर ट्रक (क्र.जीए-05-टी-7979) आणि दुचाकी (क्र. जीए-07-व्ही-5205) यांच्यात धडक बसून दुचाकीवरील हिरालाल मुरगावकर आणि मागे बसलेल्या विजया मुरगावकर (46, रा. चिंबल) हे दोघेही खाली कोसळले. त्याचवेळी विजया ह्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्या गेल्या आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिरालाल हे आपली भावजय विजया हिला म्हापशाच्या दिशेने घेऊन जात असताना हा अपघात घडला. हिरालाल यांच्यावर गोमेकॉमध्ये उपचार चालू आहेत. या अपघाताचा पंचनामा उपनिरीक्षक अरुण शिरोडकर, हवालदार सुभाष गावस यांनी केला. ट्रकचालक मोहमद अफझल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.