नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आज उत्तर प्रदेशातून राज्य सभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. पर्रीकर काल संध्याकाळी लखनऊ येथे पोचले. काल त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप विधिमंडळाशी चर्चा केली. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. एकूण दहा जागांसाठी ही निवडणूक होईल. समाजवादी पार्टीच्या सहा जणांनी, बसपच्या दोघांनी, कॉंग्रेसच्या एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. पर्रीकरांनी अर्ज भरल्यानंतर जर कुणी अर्ज भरला नाही तर सर्व दहा उमेदवारांची बिनविरोध निवड १३ रोजी घोषित केली जाईल. जास्त उमेदवार आले तर २० रोजी निवडणूक होईल. समाजवादी पार्टीच्या सहा जणांनी, बसपच्या दोघांनी, कॉंग्रेसच्या एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. पर्रीकरांनी अर्ज भरल्यानंतर जर कुणी अर्ज भरला नाही तर सर्व दहा उमेदवारांची बिनविरोध निवड १३ रोजी घोषित केली जाईल. जास्त उमेदवार आले तर २० रोजी निवडणूक होईल.