पर्रीकर, अन्य ९ जण राज्यसभेवर अविरोध

0
75

संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व अन्य नऊ जणांची काल राज्यसभेवर बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यापैकी नऊ जणांची उत्तर प्रदेशातून तर एकाची उत्तराखंडमधून निवड झाली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांची पंतप्रधान मोदींनी संरक्षणमंत्रीपदी नेमणूक केल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर जाण्यासाठी अर्ज सादर केला होता. उत्तर प्रदेशातून निवड झालेल्यांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव, आझम खानच्या पत्नी तझीम फातिमा, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सुपूत्र नीरज शेखर, रवी प्रकाश वर्मा, जावेद अली खान, चंद्रपाल सिंग यादव, बहुजन समाज पार्टीचे राजा राम, वीर सिंग व कॉंग्रेसच्या पी. एल. पुनिया यांची निवड झाली. उत्तराखंडच्या एकमेव जागेवर मनोरमा शर्मा दोबारीयाल या कॉंग्रेस उमेदवार बिनविरोध निवडून आल्या.