पर्रीकरांवर आजपासून दुसर्‍या टप्प्यातील औषधोपचार

0
115

अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दुसर्‍या टप्प्यातील औषधोपचाराला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी रविवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्यातील एकंदर परिस्थिती आणि प्रशासकीय कामकाजाची माहिती जाणून घेतली, अशी माहिती सभापती डॉ. सावंत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर सोशल मिडियावर आपले सर्व संदेश स्वतः पाठविणार आहेत. किंवा त्यांनी स्थापित केलेल्या सोशल मिडियाकडून हाताळले जाणार आहेत, असे सीएमओ गोवाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नावावर सोशल मिडियावर अनेक संदेश प्रसारित केले जात असल्याचे आढळून आले आहे. ‘ते’ सर्व संदेश खरे नाहीत. तर तिरस्करणीय आहेत, असे संदेशात म्हटले आहे.