भाजपचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवणार
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवार दि. २५ रोजी पणजी मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा सादर करतील. या मतदारसंघाची पोट निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.
पर्रीकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी नव्या उमेदवाराची निवड निवडणूक समिती स्थापन केली जाईल व त्यानंतरच उमेदवार निश्चित केला जाईल, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी एका प्रश्नावर सांगितले. सिध्दार्थ कुंकळकर हे पक्षाचे सदस्य असले तरी त्यांच्या नावांचा अद्याप तरी विचार झालेला नाही. उमेदवार कोण असेल हे निवडणूक समितीने संभाव्य उमेदवारांची यादी तयार केल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच ठरविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सांताक्रुजचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांच्या बाबतीत पक्षाला काहीही कल्पना नाही. त्यांचे नाव आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, असे ते म्हणाले.