राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी मार्च २०२३ मध्ये चार आंतरराष्ट्रीय रोड शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन खात्याने पॅरिस, झुरिच, फ्रँकफर्ट आणि व्हिएन्ना येथे रोड शो आयोजित करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पर्यटन खात्याच्या रोड शोच्या वेळापत्रकानुसार २१ मार्च रोजी पॅरिस-फ्रान्स, २४ मार्च रोजी झुरिच-स्वित्झर्लंड, २७ मार्च रोजी फ्रँकफर्ट-जर्मनी आणि २९ मार्च रोजी व्हिएन्ना-ऑस्ट्रिया या देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय रोड शो आयोजनासाठी सक्षम एजन्सीजकडून व्यवस्थापनासाठी अर्ज मागविले आहेत.