मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पाठोपाठ पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनीही बर्लीन दौर्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याने परवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखिल देसाई यांच्यासह पर्यटन खात्याचे उपसंचालक ग्रेसीएस फ्लोर हे बर्लीनकडे रवाना झाले.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे बर्लीन दौर्यातून अंग काढून घेतले होते. त्यापाठोपाठ पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशन व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बर्लीन दौर्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखिल देसाई यांच्यासह पर्यटन खात्याचे उपसंचालक ग्रेसीएस फ्लोर हे बर्लीनला रवाना झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय राज्यातील काही हॉटेल व्यावसायिक व ट्रक ऑपरेटर्सही बर्लीनला गेले आहेत.
तेथे होऊ घातलेल्या आयटीबो या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्याला हजर राहण्यासाठी हे अधिकारी बर्लीनला गेलेले आहेत. यानिमित्त गोवा पर्यटन खात्यातर्फे बर्लीन व मिलान येथे ‘रोड शो’चे आयोजन करण्यात येणार आहे.