राज्याचे पर्यटन धोरण निश्चित करताना पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, संस्था व नागरिकांच्या पर्यटनाबाबत सूचना , संकल्पना विचारात घेतल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले. गोवा माईल्सच्या टॅव्हल्स माईल्स या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
गोवा माईल्स ही गोव्यातील पहिली ऍप आधारित टॅक्सी सेवा बंद करण्यासाठी आपणावर बर्याच जणांनी दबाव आणण्यात आला होता, अशी कबुली मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.
राज्यात येणार्या पर्यटकांची सुरक्षा आणि पारदर्शक शुल्क सेवेसाठी गोवा माईल्सला पाठिंबा देण्यात आला आहे. राज्यात काही टॅक्सी चालक पर्यटकांकडून जास्त शुल्क आकारत असल्याने गोव्याचे नाव बदनाम झालेले आहे. गोवा माईल्समुळे पर्यटकांकडून जादा शुल्क आकारण्याच्या प्रकारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात पर्यटनासाठी अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. या स्थळाची ओळख पर्यटकांना करून देण्याची गरज आहे.