>> नागरी सेवेतील १६ अधिकार्यांच्या बदल्या
राज्य सरकारच्या नागरी सेवेतील १६ अधिकार्यांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला. पर्यटन खात्याच्या संचालकपदी पुन्हा एकदा मिनिनो डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरेंद्र नाईक यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (१) दक्षिण, प्रसन्न आचार्य यांची सदस्य सचिव – रवींद्र भवन मडगाव, राजेंद्र मिरजकर यांची संचालक – सरकारी छापखाना, आग्रेलो फर्नांडिस यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (२) दक्षिण गोवा, मेघनाथ परब यांची व्यवस्थापकीय संचालक – गोवा राज्य एसटी वित्त विकास महामंडळ, सिद्धिविनायक नाईक यांची अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक, अजित पंचवाडकर यांची मुख्याधिकारी – मडगाव नगरपालिका मंडळ, नारायण गाड यांची संचालक – पंचायत, गोपाळ पार्सेकर यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (२) उत्तर गोवा, दशरथ रेडकर यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (१) उत्तर गोवा, संजीव गडकर यांची एसएलएओ – मोपा विमानतळ प्रकल्प, उमेशचंद्र जोशी यांची संचालक – समाज कल्याण खाते, पराग नगर्सेकर यांची एलएलएओ – गोवा औद्योगिक विकास महामंडळ, स्नेहा मोरजकर यांची संयुक्त सचिव – सीएस आणि विकास गावणेकर यांची सहकार निबंधकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.