केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणार्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये काल गोव्याने बाजी मारत वेगवेगळ्या श्रेणीतील चार पुरस्कार पटकावले. त्यात एकूण पर्यटन विकासासाठीचा पुरस्कार, गोवा माईल्स ऍपसाठीचा पुरस्कार, कळंगुट पर्यटनस्थळाच्या उत्कृष्ट नागरी व्यवस्थापनाचा पुरस्कार आणि कामाप्रती समर्पण या गटात राज्यातील ४ जीवरक्षकांना पुरस्कार प्राप्त झाले. हे पुरस्कार २०१८-१९ या वर्षासाठीचे आहेत.
राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल जागतिक पर्यटन दिनानिमित्त दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार स्वीकारले. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते त्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. २०१८-१९ या वर्षी पर्यटनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या राज्यांना मिळून हे ८१ पुरस्कार देण्यात आले.
आज राज्याला जे पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यामागे गोवा पर्यटन खात्याचे परिश्रम असल्याचे खंवटे यांनी यावेळी सांगितले.