पर्यटकाच्या खून प्रकरणी आणखी 1 संशयित अटकेत

0
6

कळंगुट येथील मरिना शॅकमधील पर्यटकाच्या खून प्रकरणी आणखी एका संशयिताला कळंगुट पोलिसांनी काल अटक केली. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन सुनार (22, मूळ रा. नेपाळ) असे संशयिताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री मरिना शॅकमध्ये जेवणाची ऑर्डर नाकारल्याने झालेल्या वादावादीतून मारहाणीत पर्यटक भोलारवी तेजा (28, रा. आंध्रप्रदेश) याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात मरिना शॅकचा मालक आग्नेल सिल्वेरा, त्यांचा मुलगा शूबर्ट सिल्वेरा, अनिल बास्ता आणि कमल सुनार मिळून चार जणांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने या प्रकरणातील चारही संशयित आरोपांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.