पर्यटकांशी गैरवर्तन; 3 पोलिसांचे निलंबन

0
6

पोलीस खात्याने पर्यटकांशी गैरवर्तन प्रकरणात पोलीस वाहतूक विभागातील तीन पोलिसांना निलंबित केले आहे. वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी यासंबंधीचा आदेश काल जारी केला आहे. हणजूण वाहतूक पोलीस विभागाचे साहाय्यक उपनिरीक्षक मोहन चोपडेकर, हवालदार गोविंद मांद्रेकर आणि पोलीस शिपाई प्रशांत शेट्ये यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत पर्यटकांशी गैरवर्तनाचा प्रकार मागील आठवड्यात समोर आला होता. या प्रकारानंतर साहाय्यक उपनिरीक्षक मोहन चोपडेकर, हवालदार गोविंद मांद्रेकर, प्रशांत शेट्ये यांची पणजी वाहतूक शिक्षण विभागात बदली करण्यात आली होती. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर तिघांना निलंबित करण्यात आले आहे.