परिपत्रक काढण्यासाठी मंत्री गुदिन्होंचा पंचायत संचालकांवर दबाव ः कॉंग्रेस

0
120

>> प्रकल्प परवान्यांच्या पंचायतींच्या अधिकारावर गदा

पंचायत क्षेत्रात येणार्‍या नव्या प्रकल्पांना परवाने देण्याचे पंचायतींना असलेले अधिकार काढून घेऊन ते अधिकार पंचायत मंत्री या नात्याने आपणाकडे यावेत यासाठीचे परीपत्रक काढण्यास पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पंचायत संचालकांवर दबाव आणून हे परिपत्रक काढण्यास भाग पाडले होते असा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. गोवा राजीव गांधी पंचायतीराज संघटनेने बोलावलेल्या पंच सदस्यांच्या बैठकीत चोडणकर बोलत होते.

पणजी येथे कॉंग्रेस हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत पंच सदस्यांसमोर बोलताना माविन गुदिन्हो यांच्यावर जोरदार टीका केली. या परिपत्रकामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळणार असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला व या उद्देशानेच ते करण्यात आले असल्याचा आरोप केला.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यावेळी म्हणाले, की या परिपत्रकामुळे पंचायतींना असलेले अधिकार संपुष्टात येणार असून पंचायती राज संकल्पनेचे उद्दिष्ट नष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.