>> उच्च न्यायालयाची ताकीद
कळंगुट – कांदोळी येथील ज्या शॅकना सील ठोकण्यात आले आहे त्यांचे सील हे शॅकवाले जोपर्यंत सगळे परवाने मिळवत नाहीत तोपर्यंत काढू नये, अशी कडक ताकीद उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाना न घेता व्यवसाय सुरू केलेल्या कळंगुट – कांदोळी येथील 161 शॅकना सील ठोकण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारपासून वरील ठिकाणच्या परवाना नसलेल्या शॅकना सील ठोकण्याचे काम हाती घेतले होते.
या शॅक मालकांनी आता आवश्यक ते सगळे परवाने मिळवले आहेत की नाही याची खातरजमा करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी व गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण्ा मंडळाला केली आहे. तसेच त्यांनी जर परवाने मिळवले असतील तरच त्यांच्या शॅकना लावलेले सील काढून टाकावेत, अशी सूचना केली आहे.